Ad will apear here
Next
श्रीदत्त परिक्रमा
भारतात नर्मदा परिक्रमेला मोठे महत्त्व आहे. कर्दळीवन, पीठापूर, कुरवपूर आदींच्या परिक्रमाही केल्या जातात; पण २४ दत्तक्षेत्रे जोडून केल्या जाणाऱ्या परिक्रमेबद्दल अनेकांना माहिती नसते. प्रा. क्षितिज पाटुकले यांनी स्वतः ही परिक्रमा करून त्याविषयीचे अनुभव, दत्तक्षेत्रांची महती ‘श्रीदत्त परिक्रमा’ या पुस्तकातून दिली आहे. पुस्तकाच्या पहिल्या भागात दत्तात्रेय अवतार व कलियुगातील दत्त माहात्म्य यावर विवेचन केले आहे. श्री दत्तसंप्रदाय आणि परंपरा, दत्तात्रेयांचे प्रमुख शिष्य, २४ गुरू यांची थोडक्यात ओळख करून दिली आहे. श्रीदत्त परिक्रमा म्हणजे काय हेही स्पष्ट केले आहे. या परिक्रमेबाहेरील दत्तक्षेत्रांची माहितीही यात आहे. दुसऱ्या भागात परिक्रमेतील तीर्थस्थानांचा परिचय होतो. त्याची सुरुवात पुण्यातील शंकर महाराज मठापासून होते. औदुंबर, नृसिंहवाडी, अमरापूर, पैजारवाडी, कुडुत्री, बाळेकुंद्री, केंगरी, मुरगोड, कुरवपूर, मंथनगोड, कडगंची, ला़डचिंचोळी, माणिकनगर, बसवकल्याण, गाणगापूर, अक्कलकोट, लातूर, माहूर, कारंजा, भालोद, नारेश्वर, तिलकवाडा आणि गरुडेश्वर आदी २४ स्थानांची महती यात सांगितली आहे. प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणचा संपर्काचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल आदी माहितीही यात नमूद केली आहे. 

पुस्तक : श्रीदत्त परिक्रमा
लेखक :  प्रा. क्षितिज पाटुकले
प्रकाशक : कर्दळीवन सेवा संघ
पृष्ठे : १६८
मूल्य : ३०० रुपये

(‘श्रीदत्त परिक्रमा’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZWKCD
Similar Posts
कर्दळीवन : एक अनुभूती ‘कर्दळीवन’ या स्थानाला दत्त संप्रदायात महत्त्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणि श्री स्वामी समर्थांचे प्रगटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. प्रा. क्षितीज पाटुकले यांनी येथे भेट दिली. तेथील परिसर, तेथील सर्व माहिती त्यांनी घेतली
अद्भुत स्वर्गारोहिणीच्या सफरीचा माहितीपट पुणे : हिमालयाच्या कुशीत अत्यंत रमणीय, निसर्गरम्य प्रदेशात पौराणिक वारसा असलेली अनेक पवित्र तीर्थस्थळे आहेत. असेच एक ठिकाण आहे स्वर्गारोहिणी. येथूनच पांडव स्वर्गात गेले असे म्हणतात. हे ठिकाण उत्तराखंड राज्यातील बद्रिनाथ या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रापासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातील कर्दळीवन सेवा संघाने
जगभरातील एक कोटी मराठी भाषकांचा आज कोविड-१९ महाजागर पुणे : कोविड-१९ या महामारीच्या पार्श्वभूमीवर जगभरातील ४२ देशांतून, अमेरिकेतील २१ राज्यांतून आणि महाराष्ट्रासह भारतातील १२ राज्यांतून एकाच वेळी अनेक मराठी भाषक एकत्र येत आहेत. २५ मे २०२० रोजी ते सोशल मीडियावर कोविड-१९च्या संबंधाने महाजागर करणार आहेत. विश्व मराठी परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या
विश्व मराठी परिषदेतर्फे विविध ऑनलाइन कार्यशाळा विविध प्रकारच्या उपयुक्त कौशल्यांची आणि त्यातून निर्माण होणाऱ्या करिअर संधींची ओळख होण्यासाठी विश्व मराठी परिषदेच्या वतीने विविध ऑनलाइन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषक समाजाला विविध प्रकारच्या व्यावसायिक संधी कळाव्यात व त्यासाठी आवश्यक कौशल्ये अवगत व्हावीत, या उद्देशाने या कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language